लेखक/संपादक/संकलक : विराज शांताराम

Sunday 15 November 2015

इसिसचा नि:पात केल्याने इस्लामी दहशतवाद संपणार नाही

गेल्या शुक्रवारी रात्री पॅरीसवर झालेल्या फिदायीन हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच युरोपी गुप्तचर संघटनांना मिळालेल्या धाग्यादोºयांतूनही इसिसचेच नाव समोर येत आहे. या हल्ल्यात केवळ ८ अतिरेकी सहभागी झाले होते. त्यांच्या हल्ल्यात १५0 पेक्षाही जास्त निष्पाप नागरिक सहभागी झाले आहेत. जास्तीत जास्त मनुष्यहानी घडविण्याचनया उद्देशाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. या संघटनेने इराकमधील कुर्दिश नागरिकांची कत्तल चालविली आहे. तसेच सिरियात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या संघटनेच्या भीतीने लाखो सिरियाई नागरिक युरोपात पळून गेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पलायन सुरू आहे. रशियाने या आधीच सिरियात इसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. यातील गंमत म्हणजे रशियाच्या हल्ल्यांना युरोपीय देशांकडून विरोध करण्यात येत होता. पॅरीसवरील जेहादी हल्ल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. इसिसचा नि:पात करण्याची भाषा आता युरोपीय देशातून होत आहे. येत्या काही दिवसांत कदाचित युरोपीय देशही सिरियात इसिसविरोधात कारवाई करील. अमेरिकाही या लढाईत उतरू शकेल. इसिसचा नि:पात करण्यात पाश्चात्य देशांना कदाचित यशही येईल. पण, कळीचा मुद्दा हा आहे की, इस्लामी दहशतवाद संपेल का? जेहादी कारवायांना कायमचा पायबंद बसेल का? या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नाही, असेच आहे.

१९८९ साली भारतातील काश्मिरात इस्लामी दहशतवादाचा उगम झाला. हजारो लोक ठार झाले. काश्मिरी पंडीत ही एक संपूर्ण जमात काश्मिरातून बाहेर फेकली गेली. पाकिस्तान सरकारने दहशतवादाला सरकारी धोरणाचा अधिकृत भाग बनविले होते. भारताने हा मुद्दा वारंवार जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्टÑात हा मुद्दा उपस्थित केला. तथापि, युरोप-अमेरिकेने याकडे लक्ष दिले नाही. ११ सप्टेंबर २00१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल-कैदाच्या अतिरेक्यांनी विमाने धडकावून आत्मघाती हल्ला केला, तेव्हा पाश्चात्यांना इस्लामी दहशतवादाची भीषणता कळाली. या हल्ल्यात ३ हजार पेक्षाही जास्त लोक ठार झाले होते. या हल्ल्यामागे अल कैदा ही अतिरेकी संघटना जबाबदार असून तिचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने आश्रय दिल्याचे समोर आले. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश द्वितीय यांनी नाटो फौजांना सोबत घेऊन अफगाणिस्तानात हल्ला चढविला. संपूर्ण अफगाणिस्तान बेचिराख झाल्यानंतरही लादेन सापडला नाही. हे युद्ध संपल्यानंतर अनेक वर्षांनी तो पाकिस्तानात लपल्याचे आढळून आले. तोपर्यंत बुश यांचा कार्यकाळ संपून गेला होता. बराक ओबामा अमेरिके अध्यक्ष बनले होते. ओबामा यांनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे कमांडो कारवाई करून लादेनचा नि:पात केला. लादेन ठार झाला की, दहशतवाद संपेल, असे अमेरिकादी देशांना वाटले होते. तथापि, असे काही घडले नाही. तो पुढे चालूच राहिला. सिरियात इसिसच्या रुपाने तो फोफावला. सिरियात लाखो लोक मारले जात असताना, पाश्चात्य देश गप्प बसले. इतकेच काय, रशियाने सिरियात कारवाई सुरू केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियाला विरोध केला होता. पाश्चात्य देशांची दहशतवादाची व्याख्या पूर्णत: सोयीची आहे.

भारताचे एक विमान अतिरेक्यांनी अपहरण करून अफगाणिस्तानात पळवून नेले होते. विमानातील प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारला ४ खतरनाक अतिरेकी सोडावे लागले होते. हे चारही अतिरेकी पाकिस्तानचे होते. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री जसवंत सिंग यांनी हे अतिरेकी विशेष विमानाने अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेऊन सोडले होते. नंतर ते पाकिस्तानात गेले. याचाच अर्थ पाकिस्तान हेच इस्लामी दहशतवादाचे प्रमुख केंद्र आहे, हे यावरून स्पष्ट होते. तथापि, भारताला शह देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या बगलेत ठेवले आहे. सध्या पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था अमेरिकेच्या आर्थिक मदतीवरच चालते. अशा प्रकारे अमेरिका दहशतवादाचा पुरस्कार करणाºया एका देशालाच पोषित आहे. हेच कारण आहे की, अफगाणिस्तानातील अनेक वर्षांच्या युद्धानंतरही इस्लामी दहशतवाद संपला नाही. सिरियातील इसिसचा नि:पात केल्यानंतरही तो संपेल याची खात्री देता येणार नाही.

येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, इस्लाम धर्माची बांधणी दहशतवादाला पोषक आहे. इस्लामने जगाची विभागणी इस्लामी जग आणि बिगर इस्लामी जग अशी केली आहे. तसेच बिगर इस्लामी जगाला इस्लामी जगात रुपांतरीत करण्याची जबाबदारी इस्लामी जगावर सोपविली आहे. त्यासाठी जेहाद हा मार्ग सांगितला आहे. ही संकल्पता दहशतवादाला पोषक आहे. या मुद्यावर पुढील लेखात सविस्तर विवेचन आम्ही करू.

No comments:

Post a Comment